file photo
file photo 
विदर्भ

युवकाने दिली युवतीला लग्नाची ऑफर; मग घडले हे...

सकाळ वृत्तसेवा

अमरावती : तो तिच्यावर एकतर्फी प्रेम करीत होता. ती त्याला नेहमी टाळायची. त्याने सहा महिन्यांपूर्वी तिला चक्क लग्नाची ऑफर दिली. मात्र, तिने ती धुडकावली. यानंतरही तो सुधरला नाही. एके दिवशी पाठलाग करून तिला अडविले. यावेळी चिडलेल्या युवतीने त्या युवकाच्या श्रीमुखात लगावून आपली सुटका करून घेतली. 

भातकुली तालुक्‍यात ही घटना घडली. भातकुली पोलिसांनी याप्रकरणी अंकेश ऊर्फ गोलू दिनेश पिवतकर (वय 21) विरुद्ध विनयभंग, जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. युवती ओळखीची असल्यामुळे त्याने कशाचाही विचार न करता तिला एकटी असताना रस्त्यात थांबवून, थेट लग्नाची मागणी घातली. तिने स्पष्ट शब्दात नकार कळवून त्याच्यापासून स्वतःला दूरच ठेवले. परंतु अंकेश हा तिच्या एकतर्फी प्रेमात वेडा झाला. 

सहा महिन्यांनंतर हरतोटी ते बोरखडी मार्गावर सदर युवती आपल्या बहिणीसह जात असताना, अंकेशने दुचाकीवरून तिचा पाठलाग करून अडविले. बळजबरीचा प्रयत्न केला असता पीडितेच्या मोठ्या बहिणीने तिला अंकेशपासून सोडविले. मात्र, त्याने तिच्या बहिणीसोबतसुद्धा असभ्य वर्तन करण्याचा प्रयत्न केला. दोघींनी त्याच्या तावडीतून सुटताच एकीने त्याच्या श्रीमुखात लगावून त्याला धडा शिकविला. पीडितेने भातकुली ठाण्यात तक्रार केली. या प्रकरणी पोलिसांनी अंकेशविरुद्ध गुन्हा नोंदविला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कोरोना लसीच्या सर्टिफिकेटवरुन PM मोदींचा फोटो काढला! आरोग्य मंत्रालयाने का घेतला निर्णय?

Vishal Patil: "विशाल पाटील भाजपची बी टीम," चंद्रहार पाटलांचा सनसणीत आरोप; प्रचाराच्या अंतिम टप्प्यात सांगलीचा पार चढणार

Johnson Baby Powder: जॉन्सन अँड जॉन्सन कर्करोगाचे खटले निकाली काढणार; कंपनी देणार 6.5 अब्ज डॉलर्सची भरपाई

CSK Playoffs Scenario : CSKवर टांगती तलवार... प्ले-ऑफमध्ये जाण्यासाठी उरला एकच रस्ता; अन्यथा टॉप-4 मधून पत्ता कट

Navi Mumbai Crime: उरण मधील महिलेच्या हत्या प्रकरणात दुसरा आरोपी अटकेत, वय फक्त १९ वर्ष

SCROLL FOR NEXT